Saturday, July 6, 2024
Homeदेश विदेशदिल्ली-नोएडातील अनेक शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; पोलीसांकडून कसून तपासणी सुरु

दिल्ली-नोएडातील अनेक शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; पोलीसांकडून कसून तपासणी सुरु

नवी दिल्ली | New Delhiनवी दिल्ली | New Delhi
दिल्लीतल्या अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने द्वारका आणि नोएडा मधील दिल्ली पब्लिक स्कूल, मदर मैरी आणि संस्कृती स्कूलला देखील बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा ई-मेल केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीतील एकूण ८ ते ९ शाळांना धमकीचा ई-मेल आला आहे. बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर काही शाळांना तातडीने सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी काही शाळांना धमकी दिल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी आणि बुधवारी सकाळपर्यंत काही शाळांना धमकीचा ई-मेल करण्यात आलेला आहे. मेलमध्ये बीसीसी असून यामुळे एकचं मेल अनेक ठिकाणी गेला असल्याचे समोर आले आहे. शाळांमध्ये खरंच बॉम्ब ठेवले आहेत का? याची कसून तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्वात आधी द्वारका येथील हायप्रोफाइल डीपीएस शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. अग्निशमन विभागाला सकाळी ६ वाजता याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण शाळेची झडती घेण्यात आली.

धमकीचा ई-मेल आल्यानंतर दिल्ली पोलीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, अशा प्रकारचे मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने एकच मेल एकाच वेळी अनेक खासगी तसेच सरकारी संस्थांना पाठवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळ भावनेतून हे कृत्य केले आहे. पण कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही. या धमकीचे मेल आले असले तरी त्या धमक्यांत काहीही तथ्य नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या