Wednesday, April 30, 2025
Homeमुख्य बातम्यामुंबई विमानतळ १७ ऑक्टोबरला सहा तास राहणार बंद... कारण काय?

मुंबई विमानतळ १७ ऑक्टोबरला सहा तास राहणार बंद… कारण काय?

मुंबई | Mumbai

देशातील सर्वात व्यस्त असलेल्या आणि मोठ्या असलेल्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) विमानांची वाहतूक १७ ऑक्टोबर रोजी तब्बल सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विमानांची ये-जा बंद राहणार आहे. त्यामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल २५० विमानांचं उड्डाण रद्द होणार आहे. काही विमानांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत.

- Advertisement -

मुंबईत व्यापाराच्या दृष्टीने येणाऱ्यांची आणि परदेशात जणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई विमानतळ देशातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून ओळखले जाते. दिवसाला तब्बल ९०० हून अधिक उड्डाणे येथून होतात. त्यामुळे हे विमानतळ महत्वाचे मानले जाते. त्यामुळे येथील उड्डाणे सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील पावसाळ्याआधी मे महिन्यात विमानतळाच्या धावपट्टीची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली होती. आता पुन्हा धावपट्टीच्या डागडुजीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. १७ ऑक्टोबरला ही दुरुस्ती केली जाणार आहे.

या संदर्भात माहिती देतांना विमानतळाचे संचलन करणाऱ्या ‘मिआल’ कंपनीने या संदर्भात माहिती दिली आहे. विमानतळाच्या धावपट्टीची पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर दरवर्षी डागडुजी आणि दुरुस्ती केली जाते. यामुळे विमानांचे उड्डाण हे सुरक्षित राहील याची काळजी घेतली जाते. या पूर्वी गेल्यावर्षी १८ ऑक्टोबरला ही दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी २ मे रोजीही धावपट्टीची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा १७ ऑक्टोबरला दुरुस्ती केली जाणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान डागडुजी आणि दुरुस्तीसाठी ही धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे जर १७ आणि १८ ऑक्टोबरला जर तुम्ही मुंबईहून विमान प्रवास करतांना प्रवाशांनी उड्डाणाच्या वेळा तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘प्रवरे’च्या आजी-माजी संचालकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन...