Wednesday, May 22, 2024
Homeमुख्य बातम्यामनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

मुंबई | Mumbai

मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Attack on MNS Sandeep Deshpande)

- Advertisement -

सकाळी मॉर्निग वॉकला गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने, रॉडने हल्ला करण्यात आला आहे. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या पायाला लागलं आहे. यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या