Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBBD Chawl: निमंत्रण पत्रिकेत नाव पण १ गोष्ट खटकली; ऐतिहासिक क्षणाला आदित्य...

BBD Chawl: निमंत्रण पत्रिकेत नाव पण १ गोष्ट खटकली; ऐतिहासिक क्षणाला आदित्य ठाकरे मुकणार?नेमकं कारण काय?

मुंबई | Mumbai
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडातर्फे ५५६ रहिवाशांना चावी वाटप केले जाणार आहे. चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज सकाळी ११ वाजता यशवंत नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मात्र आदित्य ठाकरे आजच्या बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमात अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ५५६ सदनिकाधारकांना आज चावी वाटपाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांचे कार्यक्रम पत्रिकेत जरी नाव असले तरी कार्यक्रम रुप रेषेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. आजच्या बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचीच भाषण होणार असल्याचे समोर आले आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमात स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांचे भाषण नसल्याने नाराजी असल्याने आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी आहेत. या चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात आल्या. सुमारे ९२ एकर जमिनीवर १९५ बीडीडी चाळी असून, टप्प्याटप्प्याने या चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे. दरम्यान, बीडीडी चाळीतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार असून, त्याची सुरूवात झालीये.

YouTube video player

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 121 जुन्या चाळींतील 9 हजार 689 रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. म्हाडातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात प्रकल्पाच्या एकूण भूखंडापैकी 65 टक्के जागेचा पुनर्वसनासाठी वापर करण्यात आला आहे. 160 चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना पुनर्वसन इमारतीत 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त 2 बीएचके सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे.

अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त इमारत
४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार इमारत क्रमांक एक मधील डी व ई विंग मधील ५५६ सदनिकांचे वितरण केले जाणार आहे. स्टील्ट + पार्ट सहा मजली पोडियम पार्किंगमध्ये प्रत्येक सदनिकाधारकास एकास एक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोडियम पार्किंगच्यावर सातव्या मजल्यावर पर्यावरण पूरक उद्यानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, ग्रेनाइट ओटा, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकचा ओट्टा, ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या असून इमारतीत अग्निरोधक यंत्रणा, तीन लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट, १ फायर लिफ्ट देण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...