Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रCrime News : मुंबईत एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, लॉकअपमध्येच घेतला...

Crime News : मुंबईत एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, लॉकअपमध्येच घेतला गळफास

मुंबई | Mumbai

चार दिवसांपूर्वी मुंबईत (Mumbai News) रुपल ओग्रे (Rupal Oghre) नावाच्या एअरहोस्टेची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणात एका सफाई कर्मचाऱ्याला अटक केली होती. आरोपीने गळा चिरून रुपची हत्या केली होती. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपील ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर आता या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार आरोपीने स्वत:च्या पॅन्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. पवई येथे राहणाऱ्या रुपल आग्रे या एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रमला अटक केली होती. आरोपीचा मृतदेह थोड्याच वेळात जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात येईल, तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात येईल.

…तर पाकिस्तान करणार ‘INDIA’ नावावर दावा? काय आहे प्रकरण?

काय आहे प्रकरण?

रुपल ओग्रे ही एअर इंडियामध्ये एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेत होती. ती मूळची छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील रहिवासी होती. एप्रिल महिन्यातच ती मुंबईत आली होती. मुंबईत रुपल मरोळ येथील टाटा पॉवर सेंटर बस स्थानकाजवळील कृष्णलाल मारवाह मार्गावरील एनजी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. ती तिची बहीण आणि तिच्या मित्रासोबत राहत होती. रुपलची बहीण आणि तिचा मित्र आठ दिवसांपूर्वी मुंबईहून रायपूरला गेले होते. रूपल रविवारी सकाळी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे तिच्या कुटुंबाशी बोलली होती. यानंतर तिचा मोबाईल बंद लागत होता. कुटुंबीयांना मुलीची काळजी वाटू लागली, म्हणून त्यांनी तिच्या काही मित्रांना फोन केला. तिच्या एका मित्राने घटनास्थळ गाठलं, तेव्हा त्याला रूपलच्या फ्लॅटला कुलूप दिसले. त्याने सोसायटीला याबाबत माहिती दिली, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता रुपल त्यांना मृतावस्थेत आढळून आली. रुपलचा गळा चिरून तिचा खून करण्यात आला होता.

Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये भारत-पाक पुन्हा भिडणार, महामुकाबल्याची तारीख ठरली

- Advertisment -

ताज्या बातम्या