मुंबई | Mumbai
गेल्या जवळपास १७ दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानचा (Aryan Khan) तुरुंगवास अद्याप संपायची दिसत नाहीये.
बुधवारी एनडीपीएसच्या (NDPS) विशेष न्यायालयाने (Special Court) आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने वकिलांमार्फत तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
तसेच, सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयानेही (High Court) त्याला पुढची तारीख दिली आहे.
दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर आज (२१ ऑक्टोबर) अचानक अभिनेता शाहरुख खान ऑर्थर रोड तुरुंगात पोहोचला.
शाहरुख खानने आर्यनची भेट घेतली असून, आर्यनला अटक झाल्यानंतर बापलेकांची ही पहिलीच भेट होती. शाहरुख खानला आर्यनला भेटण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ दिला होता.
शाहरुख खान येणार असल्याची कोणालाही माहिती नव्हती. अचानक सकाळी ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी किंवा मुलगी नव्हती. फक्त खासगी सुरक्षारक्षक त्याच्यासोबत होते.