Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रFire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये आग, प्रवाशांमध्ये गोंधळ

Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये आग, प्रवाशांमध्ये गोंधळ

मुंबई । Mumbai

मुंबईमेट्रो-३ च्या बीकेसी स्थानकात आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी १ वाजून ९ मिनिटांनी मेट्रो स्थानकाच्या बेसमेंटमध्ये सुमारे ४० ते ५० फूट खाली फर्निचर असलेल्या जागी लागल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर मेट्रो-३ च्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मेट्रोतील सर्व प्रवाशांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. मुंबई मेट्रो-३ ही शहरातील पहिलीवहिली भुयारी मेट्रो असून आरे ती बीकेसी असा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. या मेट्रोची सर्व स्थानकं भूमिगत आहेत. त्यामुळे भूमिगत स्थानकात अशापद्धतीनं आगीच्या घटना घडत असतील तर गांभीर बाब मानली जात आहे.

घटनास्थळावर आता अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणाची पाहणी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ मेट्रो सेवा रद्द करण्यात आली आहे.

तळघरात असलेल्या लाकडी साहित्य आणि फर्निचर ठेवलेल्या ठिकाणी ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत असून सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या