Wednesday, August 19, 2026
Homeमुख्य बातम्याMumbai Fire News : चर्चगेट स्थानकातील दुकानाला आग; सर्वत्र धुरामुळे प्रवाशांची धावपळ

Mumbai Fire News : चर्चगेट स्थानकातील दुकानाला आग; सर्वत्र धुरामुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई | Mumbai

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट रेल्वे स्थानकावरील (Churchgate Railway Station) एका केक शॉपमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग (Fire) लागल्याची घटना घडली. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली असून, आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश आले आहे. तसेच सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, आग लागलेल्या दुकानाच्या (Shop) शेजारी बरीच दुकाने आहेत. ती तातडीने रिकामी करण्यात आली आहेत. तसेच परिसर देखील मोकळा करण्यात आला आहे. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. आग लागलेल्या दुकानात लाकडी फर्निचर असल्याने आग काही मिनिटांत भडकली. तसेच या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

हॉकी वर्ल्डकप २०२६ : भारताचा पाकिस्तानवर 5-3 फरकाने दणदणीत विजय

0
नेदरलॅंड येथील अॅमस्टेलव्हीन येथील वाजेनर मैदानावर खेळल्या गेलेल्या हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 असा दणदणीत विजय मिळवत दुसऱ्या फेरीतील आपले स्थान...