Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; वीज कोसळून स्वयंसेवकाचा मृत्यू

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; वीज कोसळून स्वयंसेवकाचा मृत्यू

मुंबई | Mumbai

मुंबईत गणेश विसर्जन (Mumbai Ganesh Visarjan) सुरू आहे. याचदरम्यान मुंबईत (Mumbai) गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. जुहू चौपाटीवर (Juhu Chowpatty) गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या मदतीसाठी तैनात असलेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू (Volunteer Death) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

मुंबईत (Mumbai) गणेश विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर (Juhu Chowpatty) मोठी गर्दी उसळते. त्या अनुषंगाने या ठिकाणी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) आणि इतर यंत्रणांकडून गणेश भक्तांच्या गर्दीचे नियोजन करणे, विसर्जनासाठी मदत करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी स्वयंसेवकदेखील उपस्थित आहेत. दुपारच्या सुमारास मुंबईत वीजांच्या कडकडाट (Lightning Strikes) झाला होता. त्याच दरम्यान वीज कोसळली (Lightning ) होती. यात 16 वर्षीय स्वयंसेवकाचा मृत्यू (Death) झाला आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या 16 वर्षीय मुलाचे नाव हसन युसूफ शेख असे आहे. सायंकाळी 4.50 वाजण्याच्या सुमारास एकजण समुद्रात बुडत असल्याचे दिसले. त्याच क्षणी जीवरक्षकांनी समुद्रात उडी घेत त्याला पाण्याबाहेर काढले. जखमी अवस्थेत असलेल्या या युवकाला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या