मुंबई | Mumbai
आयपीएलच्या (IPL) सोळाव्या हंगामातील क्वालिफायर- १ चा सामना काल चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये (CSK vs GT) झाला. यात चेन्नईने गुजरातवर विजय मिळवत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर ‘एलिमिनेटर’ चा सामना खेळविण्यात येणार असून हा सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे…
Accident News : मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले; सात जणांचा मृत्यू
लखनऊ सुपरजायंट्ने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) १ धावेने रोमहर्षक विजय मिळवत १७ गुणांची कमाई करत गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले होते. तर दुसरीकडे यंदाच्या हंगामात मुंबईला पहिल्या दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर मुंबईने कामगिरी उंचावली आणि पुढील १२ पैकी ८ साखळी सामने जिंकले. मुंबईला गुजरात टायटन्सचीही मदत झाली. गुजरातने अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर मात केली. त्यामुळे बंगळूरुचे आव्हान संपुष्टात आले आणि मुंबईला ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश मिळाला होता.
सुरगाणा बाजार समिती सभापतीपदी पवार, उपसभापतीपदी चौधरी यांची निवड
त्यानंतर आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स (Mumbai Indians and Lucknow Super Giants) यांच्यात ‘एलिमिनेटर’ चा सामना होत असून या सामन्यात विजय मिळविणाऱ्या संघाला आयपीएलमध्ये आपला पुढील प्रवास कायम ठेवण्याची संधी असणार आहे. तर पराभूत संघाला आयपीएल २०२३ मधून पॅकअप करावे लागणार आहे. त्यामुळे आज कोणता संघ विजय मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
दोन्ही संघाची संभाव्य टीम
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पीयुष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, आकाश माधवाल.
लखनऊ सुपरजायंट्स
कृणाल पांड्या (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), काइल मेअर्स, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉनिस, निकोलस पुरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.