Sunday, April 27, 2025
Homeक्रीडामुंबई विजयी चौकारासाठी सज्ज

मुंबई विजयी चौकारासाठी सज्ज

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे . सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे .

- Advertisement -

राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत ४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

राजस्थान रॉयल्स संघाच्या मागील २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आता पराभवाची हॅट्रिक टाळण्यासाठी रॉयल्स काय रणनीती आखतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर बंगळुरविरुद्ध पराभवानंतर मुंबईने सनराईझर्स हैद्राबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभूत केले आहे. आता राजस्थानविरुद्ध विजयाची मोहीम अशीच कायम ठेवण्याचा मुंबई संघाचा प्रयत्न असेल.

राजस्थान रॉयल्स संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे अष्टपैलू बेन स्ट्रोक्स संघात परतला आहे. त्यामुळे मुंबईविरुद्ध त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मागील २ सामन्यात राजस्थान संघाचे जोस बटलर, स्टीव्ह स्मीथ, संजू सॅमसन अपयशी ठरले होते.

रॉबिन उथप्पालाही अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही मुंबईविरुद्ध नव्या उमेदीने मैदानात उतरून विजयी ट्रॅकवर परतण्याचा राजस्थान संघाचा प्रयत्न असेल. मागील ४ सामन्यांमध्ये मुंबईवरुद्ध राजस्थान संघाने आपलं दबदबा कायम राखला आहे.

मुंबई संघाच्या फलंदाजीची मदार रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक , सूर्यकुमार यादव, क्रिस लीन, ईशान किशन आदित्य तारे, सौरभ तिवारी यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, अनुकूल रॉय आहेत. तर गोलंदाजीत जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लेनघन, कृणाल पंड्या, राहुल चाहर आहेत.

सलामीवीर क्विंटन डिकॉकने हैद्राबादविरुद्ध शानदार अर्धशतक ठोकून आपल्याला लय सापडली असल्याचे दाखवून दिले होते. त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे.

– सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...