अबुधाबी । वृत्तसंस्था
कर्णधार रोहित शर्मा त्यानंतर हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 48 धावांनी पराभव केला.
मुंबईने प्रथम फलंदाजी करत 191 धावा केल्या होत्या. बदल्यात पंजाबला 20 षटकात 8 बाद 143 धावा करता आल्या.मुंबईने पंजाबला 192 धावांचे आव्हान दिले होते. कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरूवात करून दिली.
पण जसप्रित बुमराहने पाचव्या षटकात मयांकची बोल्ड घेतील आणि पंजाबच्या डावाची घसरण सुरू झाली. त्यानंतर क्रुणार पंड्याने करुण नायरची विकेट घेतील. पंजाबच्या 60 धावा झाल्या असताना चाहरने राहुलची विकेट घेत सामना मुंबईच्या बाजूने झुकवला.
राहुल बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यामुळे पंजाबला विजयाची अशा होती. पण ही जोडी फार टीकली नाही. पूर्ण 44 धावा तर मॅक्सवेल 11 धावांवर बाद झाला.
त्याआधी पंजाबचा कर्णधार केएल राहुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे सुरुवातीला दिसून आले कारण मुंबईची अवस्था 2 बाद 21 अशी केली होती.
पहिल्याच षटकात कॉर्टेलने डीकॉकला शून्यावर बाद करत मुंबईला धक्का दिला. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना सुर्यकुमार यादव बाद झाला. त्यानंतर गेल्या सामन्यातील हिरो इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी तिसर्या विकेटसाठी 62 धावांची भागिदारी केली.
मुंबईने विकेट गमवल्या नाहीत पण धावसंख्या फारच धिमी होती. ती वाढवण्याचा प्रयत्न करताना इशान किशन 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहितने आयपीएलमधील 38वे अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर तो गोलंदाजांवर तुटून पडला.
70 धावा करून रोहित माघारी परतला. त्याने 45 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावा केल्या. 17 षटकात मुंबईने 5 बाद 129 धावा केल्या होत्या पण त्यानंतर हार्दिक पंड्या आणि पोलार्डने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यांनी अखेरच्या 5 षटकात 89 धावा केल्या.
यामुळे मुंबईने 20 षटकात 191 धावांपर्यंत मजल मारली.मुंबईकडून पोलार्डने 20 षटकात 47 तर हार्दिकने 11 चेंडूत 30 धावा केल्या. या दोघांनी अखेरच्या 3 षटकात 62 धावा काढल्या.