Monday, November 25, 2024
Homeक्रीडामुंबईचा दणदणीत विजय

मुंबईचा दणदणीत विजय

अबुधाबी । वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात मुंबईच्या संघाने बाजी मारली .

- Advertisement -

कोलकाताचा नवा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर राहुल त्रिपाठी ७ धावांवर बाद झाला. नितीश राणाही ५ धावा करून बाद झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेला शुबमन गिलही चुकीच्या फटक्यामुळे झेलबाद झाला.

राहुल चहरने २ चेंडूमध्ये २ बळी टिपत कोलकाताची अवस्था वाईट केली. पाठोपाठ आंद्रे रसलही अयशस्वी ठरला. पण कर्णधार इयॉन मॉर्गन-अष्टपैलू पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला.या दोघांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकून संघाला १४८पर्यंत मजल मारून दिली.

१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा जोडीने दमदार सुरूवात केली. डी कॉकने अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितने फटकेबाजीस सुरूवात केली होती, पण तो ३५ धावांवर बाद झाला.

सूर्यकुमार यादवही १० धावांवर बाद झाला. पण डी कॉक मात्र फटकेबाजी करत राहिला. त्याने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४४ चेंडूत नाबाद ७८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने ११ चेंडूत २१ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने कोलकाता विरूद्धच्या सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

या आव्हानाचा पाठलाग करताना डी कॉक ७८ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान झाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या