मुंबई
मान्सून मुंबई (Mumbai) दाखल झाला आहे. मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपले आहे. ‘नेहमीच येतो पावसाळा’ याप्रमाणे पहिल्याच पावसात नेहमीप्रमाणे मुंबईची दैना झाली. अनेक रस्त्यांवर पाऊस तुंबला. मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली.
हवामान विभागाने मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मुंबईत ११ जून पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात पुढचे ४ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने व्यक्त केली.
लोकला फटका
मुंबईत मान्सूनचं आगमन झालं की त्याचा पहिला फटका बसतो तो मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या मुंबई लोकल सेवेला. आज पावसाचा पहिलाच फटका लोकल सेवेला बसला आहे. सेंट्रल रेल्वे मार्गावर कुर्ला ते सीएसएमटी मार्गावरची लोकल सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. यानंतर पावसाचा जोर पाहता ही सेवा ठाणे ते सीएसएमटी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रात्रीपासून मुंबई शहर व उपनगरात पाऊस सुरु झाला. बुधवारी सकाळी ७ ते ८ एका तासात ३३ मिमी पाऊस पडला आहे. पूर्व उपनगरात २५ मिमी तर पश्चिम उपनगरात तुरळक पाऊस पडला आहे.. मुंबईतल्या पश्चिम उपनगर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव दमदार पाऊस सुरू आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे.
लसीकरणवर सरकार अॅक्शन मोडमध्ये, केंद्राने दिली ४४ कोटी लसींची ऑर्डर