Tuesday, June 16, 2026
Homeदेश विदेशमोठी बातमी! मुंबईहून लंडनला जाणाऱ्या विमानाला अर्ध्यातून माघारी बोलावले; समोर आले 'हे'...

मोठी बातमी! मुंबईहून लंडनला जाणाऱ्या विमानाला अर्ध्यातून माघारी बोलावले; समोर आले ‘हे’ कारण

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले ज्यात २६५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी एअर इंडियाने मुंबईहून लंडनला जाणाऱ्या आणखी एका विमानाला अर्ध्यातून माघारी बोलावले. शुक्रवारी (१३ जून) रोजी सकाळी हे विमान नियमित वेळेनुसार लंडनसाठी रवाना झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते परतीच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. यामागचे कारण आता समोर आले असून शुक्रवारी इस्रायलने इराणवर हल्ला केला. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यामुळे याचा फटका हवाई वाहतुकीवर झाला आहे.

एअर इंडियाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून एअर इंडियाने सांगितले की, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला पुन्हा माघारी बोलवण्यात आले आहे. दरम्यान, एअर इंडियाने जाहीर केलेल्या यादीत मुंबई-लंडन फ्लाइट एआय १२९ चा समावेश आहे. हे विमान सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरले आहे.

- Advertisement -

तसेच, भारतातील काही शहरातून निघालेल्या बहुतेक विमानांना परत बोलावण्यात आले आहे. भारतात येणाऱ्या विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जसे की लंडनहून मुंबईला येणारे विमान आता व्हिएन्ना मार्गे वळविण्यात आले आहे. न्यू यॉर्कहून दिल्लीला येणारे विमान आता शारजाह मार्गे येणार आहे. तसेच, न्यू यॉर्कहून मुंबईला जाणारे विमान आता जेद्दाह मार्गे येईल. दरम्यान, पाकिस्तानसोबत झालेल्या तणावामुळे भारतीय विमानांना त्यांच्या हद्दीतून प्रवास करण्यास बंदी आहे.आता इराणचे हवाई क्षेत्रदेखील बंद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत विमानांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी बराच अंतर प्रवास करावा लागणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढला आहे आणि खर्चही वाढला आहे.

एअर इंडियाने खालील विमानांचे मार्ग बदलले अथवा माघारी बोलवलं, संपूर्ण यादी
AI130 – लंडन हीथ्रो-मुंबई – व्हिएन्नाला वळवले
AI102 – न्यूयॉर्क-दिल्ली – शारजाहला वळवले
AI116 – न्यूयॉर्क-मुंबई – जेद्दाला वळवले
AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबईला वळवले
AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईला परत
AI119 – मुंबई-न्यूयॉर्क – मुंबईला परत
AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीला परत
AI106 – न्यूअर्क-दिल्ली – व्हिएन्नाला वळवले
AI188 – व्हँकुव्हर-दिल्ली – जेद्दाला वळवले
AI101 – दिल्ली-न्यूयॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानला वळवले
AI126 – शिकागो-दिल्ली – जेद्दाला वळवले
AI132 – लंडन हीथ्रो-बेंगळुरू – शारजाहला वळवले
AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली – व्हिएन्नाला वळवले
AI104 – वॉशिंग्टन-दिल्ली – व्हिएन्नाला वळवले
AI190 – टोरंटो-दिल्ली – फ्रँकफर्टला वळवले
AI189 – दिल्ली-टोरंटो – दिल्लीला परत

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...