Monday, May 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसकाळपासून जोरदार कोसळधारा! मुंबईत पावसाची मुसळधार बँटिंग, दिवसा अंधार, सखल भागात पाणी...

सकाळपासून जोरदार कोसळधारा! मुंबईत पावसाची मुसळधार बँटिंग, दिवसा अंधार, सखल भागात पाणी साचले

मुंबई | Mumbai
मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतून १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. अनेक सखोल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. पश्चिम उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे तर दक्षिण उपनगरात ही ढग दाटून आल्याने अंधारले आहे. अंधेरी, वांद्रे, गोरेगाव, भागात सकाळीच अंधार पसरल्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत रात्री जोरदार पाऊस झाला तर सकाळी ७ ते ८ वाजेपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. संपूर्ण मुंबई शहरात ढगाळ वातावरण असून अद्याप सुर्याचे दर्शन झाले नाही. सीएसएमटी, जेजे उड्डाणपूल परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. किंग्ज सर्कल परिसरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. चुनाभट्टी भागात देखील पाणी साचल्याची माहिती मिळत आहे. माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये दमदार पाऊस सुरू आहे.

पुढील दोन ते तीन तास मुंबई, आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट
मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला पावसाचा यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २९ मेनंतर पावसाचा जोर कमी होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

लोकल सेवेवर परिणाम
मध्य रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याणच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनच्या दिशेने येणारी जलद वाहतूक १० मिनिटे उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक ७-८ मिनिटे उशिराने सुरू आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ मे २०२५ – या टप्प्यावर चिंतनही गरजेचेच

0
इयत्ता अकरावी आणि अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे दिवस आहेत. ज्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा दिल्या आहेत त्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. ज्यांना दहावी आणि बारावीत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे...