Tuesday, March 25, 2025
HomeनगरAccident News : मद्यधुंद चालकाने स्कॉर्पिओ हॉटेलमध्ये घातली; एक महिला ठार, तीन...

Accident News : मद्यधुंद चालकाने स्कॉर्पिओ हॉटेलमध्ये घातली; एक महिला ठार, तीन जखमी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai Nagpur Highway) संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेली स्कॉर्पिओ (एमएच 12 एनझेड 0057 ) गाडी हॉटेल व जनरल स्टॉअर्समध्ये घुसली. या अपघातात (Accident) सुनंदा साबळे (वय 56) यांचा मृत्यू तर सुदाम काशिनाथ साबळे व त्यांची भावजय अलका वसंत साबळे हे दोन जण जखमी (Injured) झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

- Advertisement -

या प्रकरणी उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargav City Police Station) गुन्हा दाखल झालेला नाव्हता. कोपरगाव शहरातून जाणार्‍या मुंबई-नागपूर मार्गावरील एसजेएस हॉस्पिटल जवळील साई जनार्दन हॉटेल व एका जनरल स्टोअर्समध्ये भरधाव येणार्‍या स्कॉर्पिओ घुसली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) घडला. हॉटेल चालक आकाश विलास गोंदकर यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान या अपघाताची संपूर्ण दृश्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. गाडी स्टॉलमध्ये घुसताच मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार सदर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. स्कॉर्पिओ चालकाने प्रथम एका दुचाकीला धडक (Bike Hit) दिली. नंतर त्याचे नियंत्रण सुटले व तो हॉटेल व जनरल स्टॉअर्समध्ये घुसला. यात सुनंदा साबळे यांचा मृत्यू (Death) झाला. सुदाम साबळे व अलका साबळे हे जखमी झाले आहे. या अपघातामुळे स्टॉल मालक आकाश विलास गोंदकर यांचे किमान तीन ते चार लाखांचे नुकसान झाले आहे. जखमींना नजीकच्या जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...