Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रभीषण अपघात! भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं, ६ जणांचा जागीच मृत्यू... घटना CCTVत...

भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं, ६ जणांचा जागीच मृत्यू… घटना CCTVत कैद

मुंबई | Mumbai

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कंटेनरने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या काळ्या पिवळ्या जीपला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे जीप ही तब्बल ६० फुट दूर फेकली गेली. या घटनेत सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना भिवंडी तालुक्यातील खडवली गावाच्या क्रॉसिंगवर आज सकाळी ८ च्या सुमारास घडली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

- Advertisement -

चिन्मय विकास शिंदे (वय १५), रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे ( वय २७), संतोष अनंत जाधव (वय ५०), वसंत धर्मा जाधव (वय ५०), प्रज्वल शंकर फिरके अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत तर दिलीप कुमार विश्वकर्मा (वय २९), चेतना गणेश (वय १९), कुणाल ज्ञानेश्वर भरमे (वय २२) अशी जखमींची नावे आहेत.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी ‘त्या’ मौलानाला अटक; पोलीस कोठडीत रवानगी
ठाकरे गटाच्या खेळीने नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि बजोरिया अडचणीत

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ (Bhiwandi News) काळी पिवळी जीप प्रवाशांना घेऊन निघाली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास काळी पिवळी रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काळी पिवळी जीप सुमारे ६० फूट दूर फेकली गेली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू तर २ प्रवाशांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू (Accident) झाला. तर ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलिस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या