Thursday, July 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधक्कादायक! उघड्या मॅनहोलने घेतला एकाचा बळी; २० फूट अंतरावर सापडला मृतदेह, BMC...

धक्कादायक! उघड्या मॅनहोलने घेतला एकाचा बळी; २० फूट अंतरावर सापडला मृतदेह, BMC प्रशासनाविरोधात संताप

मुंबई | Mumbai

राज्यातील काही जिल्ह्यांत काल (बुधवारी) रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे मुंबईत (Mumbai) देखील पावसाने (Rain) हाहाकार घातला असून, पावसामुळे (Rain) एक दुर्घटना घडली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेनंतर पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, असलम शेख (५५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मोबाईलवर (Mobile) बोलत चालले असताना, त्यांचा अंदाज चुकल्याने ते थेट २० ते २५ फूट खोल मॅनहोलमध्ये कोसळले. साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली. एका खाजगी कंत्राटदाराकडून तिथे देखभालीचे काम सुरू होते, ज्यामुळे मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी, स्थानिक पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होते. मॅनहोलमध्ये पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाचा असल्याने असलम हे आत वाहून गेले होते. शोधकार्यादरम्यान सुरुवातीला त्यांची छत्री आणि चप्पल सापडली. यानंतर जवळपास दोन तासांच्या अथक रेस्क्यू ऑपरेशननंतर असलम यांचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.

गेल्या आठवड्यात पालिका अधिकारीच पडला होता मॅनहोलमध्ये

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच मुंबईच्या महापौर रितू तावडे शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी करत असताना त्यांच्यासमोरच मुंबई महानगरपालिकेचा (BMC) एक कर्मचारी स्वतः मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती. त्या घटनेतून कोणताही धडा न घेता प्रशासनाने आणि कंत्राटदाराने निष्काळजीपणा सुरूच ठेवल्याने आज एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...