Monday, June 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMumbai North Central Lok Sabha Result : वर्षा गायकवाड यांचा विजय, अटीतटीच्या...

Mumbai North Central Lok Sabha Result : वर्षा गायकवाड यांचा विजय, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव

मुंबई । Mumbai

- Advertisement -

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा निकाल (Mumbai North Central Lok Sabha Result) आज (मंगळवार) जाहीर झाला. यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या जागांवर महाविकास आघाडीला जोरदार यश मिळाले.

मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. यापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. यापैकी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक (LokSabha Election Result 2024) सर्वाधिक चुरशीची झाली. या मतदारसंघात उत्तर मध्य मुंबईत भाजपा (BJP) उमेदवार उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांचा पराभव झाला असून काँग्रेस (Congress) उमेदवार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) विजयी झाल्या आहेत.

संपूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान प्रचंड चुरस पाहायला मिळाली. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रसेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत होती. मतमोजणीवेळी या दोन्ही उमेदवारांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या