Friday, February 6, 2026
Homeदेश विदेशतुमचा बाबा सिद्दिकी करू; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी

तुमचा बाबा सिद्दिकी करू; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी

मुंबई । Mumbai

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शनिवारी सायंकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दहा दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या अन्यथा माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे तुमचा शेवट करू, अशा धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता.

- Advertisement -

या घटनेची बातमी पसरताच एकच खळबळ उडाली होती. दरम्यान योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारी २४ वर्षीय फातिमा खान नावाच्या तरुणीला असून तिला उल्हासनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

YouTube video player

दरम्याम, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. आजपासून सर्वच राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या मुलुखमैदानी तोफा रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

भाजपच्या यादीत योगी आदित्यनाथ यांचं नाव स्टार प्रचारक म्हणून देण्यात आलं आहे. असं असलं तरी योगी आदित्यनाथ हे भाजपसह महायुतीच्या उमेदवारांचाही प्रचार करणार आहेत. मात्र, ही सर्व धामधूम सुरू असतानाच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...