Tuesday, January 6, 2026
Homeमहाराष्ट्ररवींद्र वायकरांना 'त्या' प्रकरणात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

रवींद्र वायकरांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

मुंबई | Mumbai

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांकडून जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

जोगेश्वरी (Jogeshwari) येथील आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी रवींद्र वायकर अडचणींत आले होते. मात्र त्यांच्या विरोधात मुंबई महापालिकेने दिलेली तक्रार अपूर्ण माहितीच्या आधारे दिली गेली. या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

YouTube video player

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप वायकर यांच्यावर केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण नेमकं काय?

मुंबईतील जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात १३ हजार ६७४ चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत ५०० कोटींच्या घरात आहे. या राखीव भूखंडावर रविंद्र वायकर यांनी ५ स्टार हॉटेल बांधले असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महाापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती, असे आरोप त्यांच्यावर होते. मात्र, आता या प्रकरणातील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...