मुंबई | Mumbai
अभिनेता सलमान खानला (Salman Khan) नुकताच आलेल्या धमकीच्या ईमेलच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी रविवारी राजस्थानमधील (Rajasthan) एका व्यक्तीला अटक केली.
आरोपीला वांद्रे पोलिसांच्या पथकाने पकडले असून त्याला मुंबईत (Mumbai) आणले जात आहे. आरोपी धाकड राम बिश्नोई (21) हा जोधपूरमधील लुनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहीचा कलान गावातील सियागॉन की धानी येथील रहिवासी आहे. शस्त्रास्त्र कायद्याखालील एका गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर होता.
अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या
गेल्या आठवड्यात सलमानचा पीए जॉर्डी पटेलला हा मेल आला होता. त्यानंतर सलमानचा जवळचा मित्र प्रशांत गुंजाळकरने बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जोधपूर पोलीस आणि बांद्रा पोलिसांनी या वेळी संयुक्त कारवाई करत गुंड राम बिश्नोईला अटक केली आहे. राम बिश्नोईला आज मुंबईत आणलं जाईल. विशेष म्हणजे राम बिश्नोईनेच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनाही ईमेल पाठवून ठार मारण्याची धमकी दिली होती.
महापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची मेंढी!
सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल आल्यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तो लॉरेन्स बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याचा अंदाज आहे. एका मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, सलमान खान याने माझ्या समाजाची माफी मागावी. सलमान खान याने माफी मागितली तर मी त्याला सोडून देईल. लॉरेन्स बिश्नोई हा सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे.
ISRO ने रचला इतिहास! ३६ उपग्रहांसह सर्वात मोठ्या LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण