Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई पोलीस ड्रग्ज माफिया ललित पाटीलला घेऊन नाशकात; कारखान्याच्या ठिकाणी केली चौकशी

मुंबई पोलीस ड्रग्ज माफिया ललित पाटीलला घेऊन नाशकात; कारखान्याच्या ठिकाणी केली चौकशी

नाशिक | Nashik

- Advertisement -

ड्रग्ज माफिया आणि पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी (Mumbai Sakinaka Police) बुधवार (दि. १८ ऑक्टोबर) रोजी तामिळनाडू येथून अटक केली होती. त्यानंतर त्याला अंधेरी सेशन्स कोर्टात (Court) हजर केले असता कोर्टाने पाच दिवसांची म्हणजेच सोमवार (दि.२३ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

यानंतर आता पोलीस कोठडीत ललित पाटीलची ड्रग्जबाबत कसून चौकशी सुरु आहे. अशातच आता ललित पाटीलला चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी नाशिकजवळील शिंदे गावात आणल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे गाव परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकून ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला. त्यावेळी पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे एमडी जप्त केले होते.

त्यानंतर नाशिकरोड पोलीसांनी (Nashik Road Police) छापा (Raid) टाकून त्याठिकाणी असलेल्या ड्रग्ज बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या गोडाऊनवरून सुमारे ६ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता. यावेळी पोलिसांना त्याठिकाणी ४८७० किलोग्रॅम वजनाचा पाच कोटी ८४ लाख ४० हजार रुपये किंमतीचा पिवळसर रंगाचा पावडर स्वरूपाचा असलेला एमडी नावाचा अमली पदार्थ व १२ हजार रुपये प्रति ग्रॅम वजनाचा पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळून आला होता. तसेच सदर गोडाऊनमधून एमडी तयार करण्याचे केमिकल व इतर साधनसामुग्री असा सुमारे पाच कोटी ९४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा माल सापडला होता.

दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांकडून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि मंत्री शंभूराजे देसाई यांचा ड्रग्ज प्रकरणात संबध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ड्रग्ज प्रकरण राज्यात चांगलेच गाजत असून सरकारमधील मंत्री अडचणीत आले आहेत. तर दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्जविरोधात नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या