Saturday, November 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडलं - आदित्य ठाकरे

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडलं – आदित्य ठाकरे

उद्या मुंबईत आंदोलन करणार

मुंबई

- Advertisement -

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र होत असताना आज सायंकाळी दादर येथे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून हस्तक्षेप केला होता यावेळेस आदित्य ठाकरे यांनी पोलिसांची गाडी अडवली. आंदोलकांची सुटका होत नाही, तोपर्यंत पोलिसांची गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

दरम्यान, त्यानंतर आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरे यांचे कडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर दाखल होऊन ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना जोवर सोडत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडलं आहे, अशी घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. तसेच उद्यापासून आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा दिला आहे. स्थळ लवकरच सांगण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. यावेलीस शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देशात दडपशाही सुरु असून तानाशाही खपवून घेण्यार नसल्याचे सांगण्यात आले आहे. काही महिन्यातच सत्ता परिवर्तन होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : नाशिकचा श्वास गुदमरतोय…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. पण अलीकडच्या काही वर्षांत या सणाचे स्वरूप बदलले आहे....