Wednesday, February 4, 2026
Homeमहाराष्ट्रलोकलमध्ये धक्का लागल्याचा राग, रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाला संपवलं; आरोपी तरूणाला अटक

लोकलमध्ये धक्का लागल्याचा राग, रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाला संपवलं; आरोपी तरूणाला अटक

मुंबई । Mumbai

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि त्यातून होणारे वाद किती भीषण रूप धारण करू शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार शनिवारी संध्याकाळी मालाड रेल्वे स्थानकात घडला.

- Advertisement -

चालत्या लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एका ३१ वर्षीय तरुण प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागला. आलोक सिंह असे मृत प्राध्यापकाचे नाव असून, याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी ओंकार एकनाथ शिंदे (२७) याला १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, आलोक सिंह हे शनिवारी संध्याकाळी बोरिवली लोकलमधून प्रवास करत होते. मालाड स्थानक आले असता गाडीतून उतरताना आलोक सिंह आणि त्यांच्यासमोर उभे असलेले ओंकार शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. ओंकार हा आलोक यांना पुढे सरकण्यासाठी ढकलत होता. मात्र, पुढे महिला प्रवासी उभी असल्याने आलोक यांनी त्याला “धक्का मारू नको” असे बजावले. या साध्या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले.

हे भांडण इतक्या विकोपाला गेले की, गाडीतून उतरत असताना संतापलेल्या ओंकारने आपल्या खिशात असलेले एक टोकदार शस्त्र काढले आणि थेट आलोक सिंह यांच्या पोटात खुपसले. हा वार इतका गंभीर होता की, आलोक सिंह यांच्या पोटातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला आरोपीने चाकूने वार केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता एक वेगळीच माहिती समोर आली. आरोपी ओंकार शिंदे हा दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरातील एका मेटल कारखान्यात काम करतो. तो हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरला जाणारा एक विशेष ‘चिमटा’ (Tweezer) सोबत बाळगत होता. रागाच्या भरात त्याने याच टोकदार चिमट्याने आलोक यांच्यावर वार केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने केवळ एकच वार केल्याचे दिसत आहे, परंतु त्या चिमट्याचे टोक तीक्ष्ण असल्याने तो खोलवर रुतला आणि प्राणघातक ठरला.

घटनेनंतर आरोपी ओंकार शिंदे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला होता. त्याने गुन्ह्यात वापरलेला चिमटादेखील कुठेतरी फेकून दिला. रेल्वे पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे १२ तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याला मालाड परिसरातूनच ताब्यात घेतले. आरोपी ओंकार शिंदे हा मालाडमधील कुरार व्हिलेजचा रहिवासी आहे. बोरिवली रेल्वे पोलीस मुख्यालयात त्याची चौकशी सुरू असून, त्याने फेकून दिलेला चिमटा शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. एका सुशिक्षित प्राध्यापकाचा अशा किरकोळ कारणावरून मृत्यू झाल्याने प्रवाशांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...