Saturday, September 14, 2024
Homeमहाराष्ट्र'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर तात्पुरती टोल माफी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर तात्पुरती टोल माफी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दुरूस्तीचे काम चालू असल्यामुळे टोल न आकारण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्पुरती टोल माफी मिळणार आहे. तसेच द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

आज दिवसभरासाठी ही टोलमाफी असणार आहे. शनिवारी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूकीची कोंडी (Traffic Alert) ही ठरलेलीच असते. त्यात महामार्गावर सुरु असेललं काम पाहता, ही कोंडी अधिकच वाढली आहे. सकाळपासूनच मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे शनिवारी दिवसभरासाठी मुंबई पुणे महामार्गवरुन टोल आकारला जाऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या