Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रहृदयद्रावक! ... अन् आईच्या डोळ्यांसमोर बाळ वाहून गेले

हृदयद्रावक! … अन् आईच्या डोळ्यांसमोर बाळ वाहून गेले

मुंबई | Mumbai

सध्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली सह इतर भागात जोरदार पाऊस (Heavy Rain in Mumbai) सुरु आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवाही कोल्मडली आहे. कसारा-कल्याण दरम्यान तांत्रिक कारणामुळे लोकल बंद पडली आहे. अनेक लोकल गाड्या स्थानकात उभ्या आहेत तर काही गाड्या या स्थानकांदरम्यान थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन प्रवास करत आहेत. तर अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकलसेवा खंडीत झाली आहे. अशातच ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे मार्गावर एक दुखःद घटना घडली आहे.

- Advertisement -

रेल्वे ट्रॅकवरुन (Local Railway Track) चालत असताना येथे नाल्यावरुन जात असताना चार महिन्यांचे बाळ हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची (4 Moth Baby Drown) घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते.

मुंबईत ‘कोसळधार’ ; लोकलसह, ट्रेन, जनजीवन विस्कळीत

त्यात एक छोटे बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई पण चालत होते. यादरम्यान, अचानक त्या काकांच्या हातून चार महिनाचे बाळ निसटले आणि ते नाल्याच्या पाण्यात जाऊन पडले. नाल्याच्या तीव्र प्रवाहात ते बाळ वाहून गेले. बाळाच्या आईने रेल्वे ट्रॅकवर टाहो फोडला. आपले बाळ डोळ्यांदेखत पाण्यात वाहून गेल्याने या आईला अश्रू अनावर झाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या