Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित! विद्यार्थी संघटना आक्रमक

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित! विद्यार्थी संघटना आक्रमक

मुंबई | Mumbai

आठवडाभरापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक (Senate Election of Registered Graduate Constituency of University of Mumbai) कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र आठ दिवस उलटत नाही तोच शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) परिपत्रक काढून मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केले(Election Program Cancelled). आज अर्थात १८ ऑगस्ट रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना आदल्या दिवशी रात्री उशीरा यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

यानुसार या निवडणुका आता स्थगित झाल्या असून त्या पुन्हा कधी होणार? यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलेले नसल्यामुळे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्नाची कसोटी लांबणीवर पडलेली आहे. तर त्यांच्यासमोर आलेल्या अमित ठाकरेंशी त्यांचा सामनाही लांबला आहे.

उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या जाहिर करण्यात आलेल्या नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणुक येत्या १० सप्टेंबर,२०२३ रोजी होणार होती. यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आलेल्या असतानाच या निवडणुकीस सरकारने दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या विशेष सभेत निर्णय घेऊन अनिश्चित काळासाठी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या निवडणुकीची मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा असून सर्वच विद्यार्थी संघटनांनी निवडणुकीसाठी कंबर कसली होती. ठाकरे गटाची युवा सेना व मनसेची विद्यार्थी सेना यांनी मतदार नोंदणीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. या दोन संघटनांमध्येच हा थेट सामना होईल असेही बोलले जात होते. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत या दोन्ही संघटना व त्यांचे नेते, अर्थात आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

दरम्यान, ही निवडणूक स्थगित झाल्याने, सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेले पाहिले पाऊल आहे..” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

तर, “मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली! निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे…” अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी हल्लाबोल केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या