दिल्ली । Delhi
मुंबईवर झालेल्या २६/११ चा हल्ल्यातील दहशतवादी मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा नायब अमीर अब्दुल रहमान मक्कीचा लाहोरमध्ये रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. तो लश्कर-ए-तैयबाचा (LeT) डेप्युटी चीफ आणि हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता.
- Advertisement -
मागील वर्षी पाकिस्तानमध्ये तो अचानक गायब झाला होता. 26/11 मुंबई हल्ला आणि लाल किल्ल्यावर हल्ल्यासह अनेक मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये मक्की वॉन्टेड दहशतवादी होता. मक्की मागील वर्षी 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये गायब झाल्यानंतर असे म्हटले गेले होते की, काहींनी त्याला पळवून नेले आहे. मात्र प्रत्यक्षात 2023 मध्ये संयुक्त राष्ट्राने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याला लपवून ठेवले होते.