Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रSenate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थगित, कारण काय?

Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थगित, कारण काय?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. २२ सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक स्थगित करण्यात आली असून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठानं या निवडणुकीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कमल २८(२)(न) प्रमाणे नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाच्या निवडणुकीची निवडणूक अधिसूचना ३ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणार होती.

हे हि वाचा : पार्किंगच्या जागेवरुन वाद, महिलेला दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

या निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित मतदार, उमेदवार, तसेच निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कळवण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार, २२ सप्टेंबर रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे.

सलग दुसऱ्यांदा सिनेटची ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी १० सप्टेंबरला सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होतं. मात्र, तेव्हाही अचानक ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठानं जाहीर केला. त्यावर विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने यासंदर्भात १७ ऑगस्टला विद्यापीठाला पत्र दिलं. या पत्रानंतर विद्यापीठानं ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

हे हि वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनल हॅक, मध्येच सुरू झाला भलताच व्हिडीओ

- Advertisment -

ताज्या बातम्या