Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजप नेते म्हणतात, 'घाईमध्ये निमंत्रण…''

राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजप नेते म्हणतात, ‘घाईमध्ये निमंत्रण…”

मुंबई | Mumbai
देशात एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी देशविदेशातील नेते उपस्थित होते. एनडीएतील नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. असे असताना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने मनसैनिकांमध्ये नाराजी पसरल्याचे पहायला मिळाले. मात्र आता भाजपाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला होता. महायुतीच्या नेत्यांसाठी त्यांनी राज्यात काही ठिकाणी जाहीर सभादेखील घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते, त्यामुळे ते जिंकून आल्याचा दावाही मनसैनिकांनी केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण न मिळाल्याने मनसैनिकांनी खंत व्यक्त केली होती. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळाले असते तर आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या सगळ्या प्रकरणावर भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नसणे चर्चेचा विषय झालाय. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय. दरम्यान घाईमध्ये निमंत्रण द्यायचे राहिले असेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.

कधी कधी घाईमध्ये निमंत्रण देताना जी यादी करतात तिथे कधी कधी आपले मित्र आहेत त्यांना निमंत्रण द्यायचे राहून जातं. केंद्रीय पक्षाने याची नोंद घ्यायला हवी. आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा हात पुढ करतो तेव्हा असं होऊ नये याची काळजी घ्यायला हवी,” असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

शपथविधीला निमंत्रण का नाही दिले? याबद्दल माहित नाही. ह्याविषयी राज ठाकरे बोलतील. सुधीर मुनगंटीवार यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली, असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. दरम्यान, यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.’ राज ठाकरे यांना निमंत्रण नव्हते असे बाळा नांदगावकर म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या