Sunday, September 15, 2024
Homeनाशिकप्रतिबंधित प्लास्टिक वापरल्याने दंडात्मक कारवाई

प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्याने दंडात्मक कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

पंचवटी विभागात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री करताना आढळल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली. चार व्यावसायिकांना पाच हजार रूपये प्रमाणे 20 हजार रुपये दंड आकारण्यात आला. 16 किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता करणार्या दोन व्यक्तींना दोन हजार रुपये दंड करण्यात आला आहे. असा एकूण 22 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

पेठ रोड, दिंडोरीरोड, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आतील व्यवसायिक आणि बाहेरील विक्रेते, हिरावाडी इत्यादी ठिकाणी पाहणी करुन कारवाई करण्यात आली. विभागात विविध ठिकाणी स्वच्छतेची पाहणी करीत असताना भाजी विक्रेते, मटण-चिकन विक्रेते, दूध विक्रेते, बेकरी दुकानदार, व्यावसायिक आदी ठिकाणी प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशवी न वापरण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. मनपाच्या सहा विभागात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करु नये यासाठी सातत्याने जनजागृती केली जात आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाईही केली जात आहे.

महाराष्ट्र अविघटनशिल कचरा (नियंत्रण)अधिनियम, 2006 महाराष्ट्र प्लास्टिक आणि थार्मोकोल अविघटनशील वस्तूचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अवर सचिव, महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरण बदल विभाग मुंबई यांच्या अधिसूचनेनुसार तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांच्या आदेशाने व घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.कल्पना कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई दरम्यान पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक दीपक चव्हाण, उदय वसावे, किरण मारू, डी. बी. माळेकर, स्वच्छता मुकादम संजय पडाया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे, सहाय्यक सचिव निवृत्ती डहाणू बागुल, रवींद्र तुपे आदींनी सहभाग घेतला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या