Friday, December 6, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाची बस भाड्यात 'इतक्या' टक्क्यांनी वाढ

मनपाची बस भाड्यात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वर्षाला सुमारे वीस कोटी रुपये तोट्यात चालणारी नाशिक महापालिकेची बस सेवा (Nashik Municipal Corporation Bus Service) नाशिककरांच्या पसंतीस उतरली असली तरी नवीन वर्षापासून बस भाड्यात (bus fare) 7 टक्के टक्के दर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक प्राधिकरणकडे (Regional Authority) पाठवण्यात आला आहे. दरम्यान तिकिटासह मासिक पासवर देखील दरवाढ लागू करण्यात येणार आहे. दरम्यान आधुनिक पद्धतीने चालणाऱ्या बसचा आधुनिक ॲप (mobile app) एक लाखापेक्षा जास्त नागरिकांनी डाउनलोड केला आहे. डिझेलपाठोपाठ (Diesel) सीएनजीचे (CNG) दर वाढत असून, त्यामुळे सिटी लिंकचा (City Link) खर्चही वाढला आहे.

तर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळूनही तोट्यात घट होत नाही. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी जानेवारी 2023 पासून सिटी लिंकच्या (City Link) तिकीट दरात सरासरी ७ टक्के भाडेवाढ केली जाणार आहे. नाशिक (nashik) शहरासह परिसरात सिटी लिंकला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची प्रती दिन संख्या बघता प्रती किलोमीटर उत्पन्नदेखील वाढणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीचा तोटा कमी होत नसल्याने आयुक्त डॉ. पुलकुंडवार (Commissioner Dr. Pulkundwar) यांनी याबाबत चर्चा केली होती. त्यावर सीएनजी आणि डिझेलचे दर वाढल्याने उत्पन्न वाढूनही अपेक्षित फायदा होत नसल्याचे लक्षात आले.

सध्या नाशिक शहरात स्टीलिंगच्या वतीने एकूण 230 बसेस असून त्यात 185 सीएनजी बसेस आहे, तर उर्वरित डिझेल बसेस आहे. दरम्यान तोटा कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाय योजना देखील सुरू केले आहेत. त्यानुसार प्रत्येक बसेस वर जाहिरात देखील लावण्यात येणार आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराशी बोलणी सुरू असून जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात काही भाग ठेकेदाराला देखील जाणार असल्याचे समजते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या