Wednesday, December 4, 2024
Homeनगरमनपा प्रशासनाला मोकाट कुत्र्यांच्या देखाव्याची भेट!

मनपा प्रशासनाला मोकाट कुत्र्यांच्या देखाव्याची भेट!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुले रस्त्यावर खेळू शकत नाहीत, त्यांना घरातच ठेवण्याची वेळ आली. यापूर्वी वारंवार हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने मुलांचे लहानपण पिंजर्‍यात कैद झाले असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी मनपा उपायुक्त सचिन बांगर यांना मोकाट कुत्र्यांचा देखावा भेट म्हणून दिला.

- Advertisement -

स्थायी समितीची सभा सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. सभेच्या सुरूवातीसच मोकाट कुत्र्यांचा प्रश्न नगरसेवक रूपाली वारे, विनीत पाऊलबुध्दे व सुनील त्र्यंबके यांनी उपस्थित केला. मोकट कुत्री पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची निविदा तीन महिन्यांपूर्वी संपुष्टात आली. मात्र, फेरनिविदाही काढली गेली नाही आणि मनपाकडूनही मोहीम राबवली जात नाही, हंगामी स्वरूपात हे काम अन्य कोणाला काम दिले नाही. त्यामुळे कुत्रे, डुकरे यांचा शहरात सुळसुळाट झाल्याचा आरोप त्यांनी केला.

मोकाट कुत्र्यांच्या उच्छादास आवर घालण्यात, प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संतप्त नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. तसच आंदोलनाचा इशारा देत प्रशासनावर भ्रष्टाचाराचा, टक्केवारीचाही आरोप केला. अखेर 28 ऑगस्टपूर्वी प्रतिबंधक उपाय करण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाने स्वतःची सुटका करून घेतली. सभापती कवडे यांनी महासभेत कुत्रे सोडण्याचा इशारा दिला. टक्केवारीच्या घोळामुळेच निविदा काढली गेली नाही, असा आरोप पाऊलबुध्दे यांनी केला. निर्बीजीकरण न करताच देयके काढली जात असल्याचा आरोप संपत बारस्कर यांनी केला.

कोंडवाडा विभाग प्रमुख डॉ. सतीश राजुरकर सभेस अनुपस्थित होते. त्यामुळे नगरसेवकांच्या संतापात अधिकच भर पडली. सभेच्या दिवशी अधिकारी कसे गैरहजर राहतात अशीही विचारणा त्यांनी सभापती व अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांच्याकडे केली. राजूरकर यांना कार्यमुक्त करण्याची मागणीही करण्यात आली. त्यांच्याकडून कोंडवाडा विभाग काढून घेण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसांत मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास उपोषणाचा इशारा पाऊलबुधे यांनी दिला. अखेर यासाठी 28 ऑगस्टपर्यंत अधिकार्‍यांना मुदत देण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या