Friday, November 15, 2024
Homeनगरअधिसूचनेआधीच नामफलक बदलला; मनपा आयुक्तांच्या चौकशीची मागणी

अधिसूचनेआधीच नामफलक बदलला; मनपा आयुक्तांच्या चौकशीची मागणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सामान्य प्रशासन विभागाने प्रसिध्द केलेली अधिसूचना अंतिम समजून मनपा आयुक्तांनी परस्पर अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव केल्याच्या घटनेचा शाकीर शेख यांनी निषेध केला असून, मनपा आयुक्तांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत महसूल विभागाकडून अंतिम अधिसूचना प्रसिध्द होत नाही, तोपर्यंत पूर्वीचे नाव वापरावे, असे कळवले होते, पण मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर अहमदनगर हे नाव खोडून अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव नमूद केले. त्यामुळे शेख यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून तक्रार केली आहे.

- Advertisement -

पत्रात शेख यांनी म्हटले आहे, अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने राज्य शासनाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास केंद्रीय गृह विभागाने नाव बदलण्याबाबत ना-हरकत दिली. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना प्रसिध्द केली. या अधिसूचनेच्या अनुषंगाने शासनाच्या महसूल विभागाकडून प्रारूप अधिसूचना प्रसिध्द करून त्यावर नागरिकांच्या हरकती मागवण्यात येतात. त्या हरकती विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यास सूचित केले जाते. पण, सामान्य प्रशासन विभागाने प्रसिध्द केलेली अधिसूचना अंतिम समजून मनपा आयुक्तांनी परस्पर अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव केल्याचे शेख यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या