Tuesday, May 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMunicipal Corporation Election : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील ४२३ जागांसाठी १५ जानेवारीला...

Municipal Corporation Election : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील ४२३ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान; कोणत्या महापालिकेत किती जागा?

नाशिक | Nashik

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा (NMC Election) निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांनी आज (सोमवार) सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. या महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

- Advertisement -

२९ महापालिकांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) एकूण पाच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यात नाशिक महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका आणि अहिल्यानगर महानगरपालिकेचा समावेश आहे. या पाचही महापालिकांच्या एकूण ४२३ जागांसाठी मतदान होणार आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! मनपा निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला मतदान, मतमोजणी कधी?

कोणत्या महापालिकेत किती जागा?

नाशिक महानगरपालिका – १२२
मालेगाव महानगरपालिका – ८४
धुळे महानगरपालिका – ७३
जळगाव महानगरपालिका – ७५
अहिल्यानगर महानगरपालिका – ६८

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरण्याची तारीख – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्ज छाननीची तारीख – ३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची तारीख – ०२ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी – ०३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणीची तारीख – १६ जानेवारी २०२६

उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा किती?

अ वर्ग महापालिका  : १५ लाख रुपये

ब वर्ग महापालिका : १३ लाख रुपये

क वर्ग महापालिका : ११ लाख रुपये

ड वर्ग महापालिका : ०९ लाख रुपये

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या होणार निवडणुका

१) अहिल्यानगर महानगरपालिका २) अकोला महानगरपालिका ३) अमरावती महानगरपालिका ४) भिवंडी निजामपूर महानगरपालिका ५) बृहन्मुंबई महानगरपालिका ६) चंद्रपूर महानगरपालिका ७) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
८) धुळे महानगरपालिका ९) इचलकरंजी महानगरपालिका १०) जळगाव महानगरपालिका ११) जालना महानगरपालिका
१२) कल्याण डोंबिवली महानगरपालिका १३) कोल्हापूर महानगरपालिका १४) लातूर महानगरपालिका १५) मालेगाव महानगरपालिका १६) मीरा भाईंदर महानगरपालिका १७) नागपूर महानगरपालिका १८) नांदेड वाघाळा महानगरपालिका
१९) नाशिक महानगरपालिका २०) नवी मुंबई महानगरपालिका २१) पनवेल महानगरपालिका २२) परभणी महानगरपालिका २३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका २४) पुणे महानगरपालिका २५) सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका २६) सोलापूर महानगरपालिका २७) ठाणे महानगरपालिका २८) उल्हासनगर महानगरपालिका
२९) वसई-विरार महानगरपालिका

ताज्या बातम्या

NEET Paper Leak : नीट पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन; एक जण...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बारावीच्या परीक्षेनंतर (HSC Exam) विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी दि.०३ मे २०२६ रोजी नीट...