Friday, April 25, 2025
Homeनगरमनपाच्या कर्मचारी आकृतिबंधातील पदरचनेत फेरबदल होणार

मनपाच्या कर्मचारी आकृतिबंधातील पदरचनेत फेरबदल होणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या मंजूर असलेल्या कर्मचारी आकृतिबंधातील (स्टाफींग पॅटर्न) पद रचनेत फेरबदल करण्यात येणार आहेत. सध्या मंजूर असलेल्या आकृतिबंधानुसार असलेल्या पदे व पद नामांमुळे काही अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नतीची संधी मिळत नाही. आवश्यकतेनुसार काही नवीन पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासनाने सर्व खाते प्रमुख व कर्मचार्‍यांकडून सूचना मागवल्या आहेत.

- Advertisement -

शासनाने 6 फेब्रुवारी 2016 रोजी महापालिकेचा 2890 पदांचा कर्मचारी आकृतिबंध मंजूर केलेला आहे. त्यानंतर 16 डिसेंबर 2021, 28 मार्च 2022 व 28 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे यात तीन वेळा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी अर्ज देऊन पदोन्नतीची संधी नसल्याबाबत, पदनाम दुरूस्तीबाबत, नवीन पद निर्मितीबाबत सुधारणा करण्याच्या सूचना करत आहेत.

आकृतिबंध व सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीने शासनाकडे सादर करावा लागतो. त्यामुळे आकृतिबंध व सेवाप्रवेश नियमाबाबतचे प्रस्ताव वेळोवेळी सादर न करता एकत्रितपणे सादर करावेत असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार ज्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोत्रतीची संधी उपलब्ध नसल्यामुळे आकृतिबंध व सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा करावी, असे वाटते, त्यांनी सूचना द्याव्यात, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्राप्त सूचनांची दखल घेऊन, पडताळणी करून आवश्यक फेरबदल करण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे. स्थायी समितीची मंजुरी घेऊन शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...