Monday, May 27, 2024
Homeनगरफसवणूक केल्याप्रकरणी मनपाकडून ठेकेदार भगत विरोधात गुन्हा दाखल

फसवणूक केल्याप्रकरणी मनपाकडून ठेकेदार भगत विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात रस्ता बाजू शुल्क वसुलीचे काम करणार्‍या श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेने (जि. नांदेड) 187 दिवसांचे 24 लाख 2 हजार 950 रुपये भरणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी केवळ 6 लाख 90 हजार 855 रुपये जमा करून उर्वरीत रक्कम न भरल्याने महापालिकेने कठोर कारवाई केली आहे. महापालिकेची फसवणूक करत 11 लाख 98 हजार 995 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ठेकेदार गणेश भगत यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मार्केट विभाग प्रमुख विजयकुमार बालानी यांनी फिर्याद दिली आहे. महापालिकेने भगत यांच्या श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या संस्थेस रस्ता बाजू मांडणी फी व स्लॉटर फी वसुलीसाठी 1 डिसेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी ठेका दिला होता. त्यांनी दरमहिन्याच्या पाच तारखेला 3 लाख 90 हजार 855 रुपये, असे एकूण 46 लाख 90 हजार 250 रुपये जमा करणे ठरले होते. ठेकेदाराने मुदतीत हप्ते न भरल्याने त्यांच्याकडून करारनाम्याच्या अटीनुसार थकीत रकमेवर 24 टक्के व्याजासह रक्कम आकारण्याचा करार करण्यात आला होता.

5 जून अखेरपर्यंत ठेकेदार गणेश भगत यांनी करारनाम्यानुसार रस्ता बाजू मांडणी फी व स्लॉटर फी लोकांकडून वसूल केली. त्यांनी 187 दिवसांचे प्रतिदिनी 12 हजार 850 रुपये या प्रमाणे एकूण 24 लाख 2 हजार 950 रुपये भरणे अपेक्षीत होते. मात्र, त्यांनी केवळ 6 लाख 90 हजार 855 रुपये जमा केले. उर्वरीत रक्कम भरण्याबाबत त्यांनी प्रतिसाद दिला नाही व अद्यापही उर्वरीत रक्कम भरलेली नाही. महापालिकेची 11 लाख 98 हजार 995 रुपयांची फसवणूक करून अपहार केल्याची फिर्याद विभाग प्रमुख बालानी यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गाडगे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या