Saturday, July 27, 2024
Homeनगरकर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यासह नामकरणाचा विषय अजेंड्यावर

कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यासह नामकरणाचा विषय अजेंड्यावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेत अभियंता, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वीजतंत्री, वायरमन, लॅब टेक्निशियन अशा पदांवर गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी पध्दतीने काम करणार्‍या 22 कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला आहे. येत्या 15 सप्टेंबरला होणार्‍या सर्वसाधारण सभेत या विषयावर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, सभेत नामकरणाचे 7 व मनपाच्या जागा विविध संस्थांना देण्याचे 7 विषयही अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

9 मे रोजी मागील महासभा झाली होती. आता तब्बल चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. या सभेची जम्बो विषय पत्रिका जारी करण्यात आली असून, 27 विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.

यात अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी 1, परिचारीका 4, लॅब टेक्निशियन 1, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 3, कनिष्ठ अभियंता (अ‍ॅटो मोबाइल) 1, विजतंत्री 2, वायरमन 10 अशा 22 कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घेण्याची शिफारस केली आहे. यासह वैद्यकीय प्रतिपूर्ती, कर्मचार्‍यांच्या थकीत बिलांचे समायोजन, विविध दैनिकांची जाहिरातींची थकीत बिले, वाचनालयातील वृत्तपत्रांची थकीत बिले, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुलाचे 33 लाभार्थ्यांचे प्रस्ताव, केंद्र सरकारची पीएम बस योजना शहरात राबवणे, आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत निधीसाठी प्रस्ताव पाठवणे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून कामे निश्चित करून प्रस्ताव पाठवणे, माळीवाडा वेस येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याशेजारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवणे आदी विविध विषयांवर निर्णय होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या