Saturday, July 27, 2024
Homeनगरनगरमध्ये मनपाची 12 आरोग्य केंद्रे

नगरमध्ये मनपाची 12 आरोग्य केंद्रे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात महापालिका (Municipal Corporation) नव्याने 12 आरोग्य केंद्रे (Health Centers) करणार आहे. या प्रस्तावित आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी नालेगाव (Nalegav) येथे स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला आहे. आता संजयनगर, समर्थनगर (लालटाकी), शास्त्रीनगर (केडगाव), इंदिरानगर, शिवाजीनगर (कल्याण रोड), बोल्हेगाव, तपोवन रोड येथील सात केंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेद्वारे नगर शहरात 12 आरोग्यवर्धिनी केंद्र (Arogyavardhini Center) करण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणार्‍या या आरोग्य केंद्राद्वारे नागरिकांना मोफत तपासणी, उपचार व औषधे दिली जाणार आहेत. काही प्राथमिक रक्त तपासण्याही मोफत केल्या जाणार आहेत. येत्या महिनाभरात यातील सात आरोग्य केंद्रांवर (Health Centers) नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत.

अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी नुकताच या कामाचा आढावा घेतला. सध्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयास महापालिकेकडून सात आरोग्य केंद्रावर सेवा दिली जात आहे. आता आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून आणखी 12 उपकेंद्रांवर सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जागा निश्चित केल्या आहेत. मनपाच्या अस्तित्वात असलेल्या इमारतींमध्ये नूतनीकरण करून त्यात फर्निचर व इतर साहित्य उपलब्ध केले जाणार आहे. येत्या महिनाभरात या केंद्रांवर नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. श्रमिकनगर (वैदुवाडी), नालेगाव (वारुळाचा मारुती परिसर), फर्‍याबाग (सारसनगर), निर्मलनगर व रामवाडी (सर्जेपुरा) अशा अन्य आणखी पाच ठिकाणी ही केंद्रे होणार आहेत.

गरीबांना मिळणार सुविधा

सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्येमागे एक यानुसार शहरात झोपडपट्टी, चाळ, गरीब-सामान्य लोकवस्ती असलेल्या भागात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. आरोग्य तपासणी व उपचार यासह राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमही या केंद्रांवर राबविण्यात येणार आहेत. येत्या पाच वर्षांसाठी सुमारे साडेसात कोटी रुपये खर्चून ही सेवा दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या