अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यभरात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाने पेट घेतला आहे. बीड (Beed) व मराठवाड्यातील इतर शहरामध्ये राजकीय नेत्यांचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड (Political Flex Board) फाडणे, काळे फासण्याचे आंदोलन सुरू आहे. सर्वत्र त्याचे पडसाद उमटत आहेत. त्याचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणा खबरदारी घेत आहेत. नगर शहरातही फ्लेक्स बोर्ड फाडण्याचा प्रकार घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेले फ्लेक्स बोर्ड फाडणे, काळे फासले जाण्याची शक्यता असल्याने महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाने तातडीने सोमवारी रात्री उशिरा राजकीय फ्लेक्स बोर्ड (Political Flex Board) काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.
नगर-नाशिकच्या धरणांतून 8.6 टीएमसी पाणी मराठवाड्याला सोडणार
मराठा आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटण्यास सुरूवात झाली आहे. जाळपोळीच्या घटना वाढल्या आहेत. ठिकठिकाणी उग्र आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil ) यांच्या समर्थनार्थ नगर शहरातही सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमरण उपोषण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावात नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. रविवारी तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत असलेल्या अधिवेशनातही आंदोलकांनी गोंधळ घातला. फ्लेक्स बोर्डही फाडला. त्यामुळे मंत्र्यांचे दौरे रद्द करण्याची वेळ आली.
डॉक्टरला बांधले, 40 लाख रुपये लुटले
त्यामुळे संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी महापालिका आयुक्तांशी केलेल्या चर्चेनंतर सोमवारी रात्री उशिरा महापालिकेने Municipal Corporation शहरात लावलेले सर्व राजकीय नेत्यांचे फलक असलेले बोर्ड व इतर बोर्ड काढण्यास सुरूवात केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक शहरात कारवाई (Action) करत आहेत.
…अन्यथा समाजासमाजांत वैचारिक, भावनिक विरोधाची शक्यता