Tuesday, March 25, 2025
Homeनगरपरीक्षेपूर्वी शाळा, कॉलेज परिसरातील प्रलंबित रस्त्यांची कामे करून घ्यावी

परीक्षेपूर्वी शाळा, कॉलेज परिसरातील प्रलंबित रस्त्यांची कामे करून घ्यावी

उपाययोजना करण्याच्या बांधकाम विभागाला सूचना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. यात प्रमुख रस्त्यांवर असलेल्या महाविद्यालय व शाळांच्या परिसरात कामे सुरू आहेत. पुढील काही दिवसांत दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षा काळात रस्त्यांच्या कामामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक, शाळांच्या कर्मचार्‍यांना त्रास होऊ नये, यादृष्टीने तत्काळ रस्त्याच्या कामांची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बैठक घेऊन बांधकाम विभागाला दिले. त्यानंतर अधिकार्‍यांनी तत्काळ रस्त्यांची पाहणी केली.

- Advertisement -

लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे सारडा कॉलेज, न्यू आर्ट्स कॉलेज, रेसिडेन्शियल हायस्कूल, फिरोदिया हायस्कूल, केडगाव येथील अंबिका विद्यालय आदी भागात सुरू असलेल्या व सुरू होणार्‍या रस्त्यांच्या कामांचा आढावा आयुक्त डांगे यांनी घेतला. पत्रकार चौकापासून ते दिल्लीगेट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावर सारडा, न्यू आर्ट्स, रेसिडेन्शियल कॉलेज आहेत. लालटाकी येथे शाळा आहे. तसेच, वाडिया पार्क संकुलासमोर फिरोदिया संस्थेच्या तीन शाळा व इतर शाळा आहेत. तेथील कामांना गती देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. काम तत्काळ पूर्ण होणार नसले, तरी परीक्षा काळात शाळेत अथवा महाविद्यालयात येण्याजाण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात.

बांधकाम विभागासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी व शाळा, कॉलेज परिसरात प्रलंबित असलेली कामे करून घ्यावीत, अशा सूचना आयुक्त डांगे यांनी दिल्या. शहरासह केडगाव येथे अंबिका विद्यालय परिसरात रस्त्याचे काम सुरू होणार आहे. त्या ठिकाणीही समक्ष पाहणी करून शाळेत जाण्यासाठी अडथळे होणार नाहीत, यादृष्टीने नियोजन करून काम सुरू करावे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आयुक्त डांगे यांनी सूचना देताच बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी तत्काळ समक्ष पाहणी केली व ठेकेदार प्रतिनिधींना सूचना दिल्या. रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी महानगरपालिका उपाययोजना करत असली तरी काही अडचणी येऊ शकतात. अशावेळी नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी, महानगरपालिकेकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे आवाहनही डांगे यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...