Saturday, July 27, 2024
Homeनगरमहापालिका : 25 विषयांना स्थायी समितीच्या सभेत मंजुरी

महापालिका : 25 विषयांना स्थायी समितीच्या सभेत मंजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मलनिःसारण प्रकल्प, अमरधामसह बुरूडगाव व सावेडी कचरा डेपोमध्ये 2 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, सहकार सभागृह ते महात्मा फुले चौक रस्त्याची निविदा यासह विविध 25 विषयांना महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

- Advertisement -

महापौर रोहिणी शेंडगे यांचे सासरे व माजी नगरसेवक संजय शेंडगे यांचे वडील छगनराव रभाजी शेंडगे यांचे, तसेच आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या आजीचे निधन झाल्याने सभागृहात त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कोणत्याही विषयांवर चर्चा न करता आठ मिनिटांत सर्व विषय मंजूर करून सभा संपली. स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सभेच्या सुरूवातीलाच स्व. शेंडगे यांच्या श्रध्दांजलीचा प्रस्ताव मांडला. श्रध्दांजली वाहण्यात आल्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. त्यानंतर इतर सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभेस नगरसेवक मुदस्सर शेख, प्रदीप परदेशी, राहुल कांबळे, सुनील त्रिंबके, रूपाली वारे, सुनीता कोतकर, सुवर्णा गेनाप्पा, मंगल लोखंडे आदींसह अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.

दरम्यान, सभेत सभापती कवडे यांनी महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेला चौथरा व पुतळ्याच्या कामाची माहिती मागवली. सर्व विभागांची शासकीय मंजुरी मिळालेली आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे याची माहिती सादर करण्यात आली आहे. त्यांच्या स्तरावर समितीची बैठक होऊन अंतिम परवानगी मिळेल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार झालेला आहे. चौथरा अंतिम टप्प्यात आहे. जिना व रंगरंगोटीचे काम बाकी असल्याचे शहर अभियंता मनोज पारखे यांनी सांगितले. येत्या 15 दिवसात हे काम पूर्ण करा. पुढील महिन्यात सर्वांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना कवडे यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या