Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार

मनपा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार

नाशिक | फारुक पठाण | Nashik

- Advertisement -

राज्याचे अधिवेशन (convention) सुरू आहे. दरम्यान अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात नाशिक महापालिकेसह (Nashik Municipal Corporation) इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या (election) दृष्टीने महत्त्वाचा प्रस्ताव येणार असल्याचे समजते

तसेच त्यानुसार आगामी महापालिका निवडणुका पुन्हा चार सदस्य प्रभाग पद्धतीने करण्याचा प्रस्ताव येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान 2017 प्रमाणे चार सदस्य प्रभाग झाले तर महापालिका निवडणूक (election) देखील लवकर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चालू महिन्याच्या शेवटी महापालिका निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार असून मे महिन्यात मतदान (voting) करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांनी तयारी सुरू केली असली तरी विरोधकांना गाफील ठेवून निवडणुका उरकण्याची रणनीती आखल्याचे देखील समजते.

त्यामुळे मागील एक वर्षापासून तयारीत असलेले इच्छुक उमेदवार अलर्ट मुडवर आहे. नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 13 मार्च 22 पासून प्रशासक राजवट (Administrator regime) लागली आहे. 1992 साली पहिली मनपा निवडणूक झाली होती. त्यानंतर दर पाच वर्षांनी वेळेत निवडणूक (election) होऊन महापौरांची निवड झालेली आहे. मात्र यंदा करोना तसेच नंतर ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) रखडलेली महापालिका निवडणूक कधी होणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही.

तरी राज्यातील महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता गेल्यानंतर पुन्हा चार सदस्य प्रभाग होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2017 सालची निवडणुक राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना याच पद्धतीने झाली होती. त्यामुळे कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे (BJP) तब्बल 66 नगरसेवक निवडून आले होते तर एक हाती सत्ता मागील पाच वर्षे नाशिक मनपात होती.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने नाशिक महापालिकेत 11 नगरसेवकांची वाढ करून तीन सदस्यी प्रभाग रचना तयार केली होती. मात्र शिंदे सरकारने वाढीव संख्या रद्द केली आहे, मात्र निवडणूक तीन की चार सदस्यी याबाबात स्पष्ट निर्देश दिलेले नाही, यामुळे इच्छुकांसह नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. दरम्यान तीन सदस्य प्रभाग रचनेचा आदेश रद्द करून चार सदस्य प्रभाग रचना करण्याचा आदेश काढावा लागणार आहे, त्यासाठी अधिवेशन मध्येच हा प्रस्ताव ठेवल्यास अत्यंत सोप्या पद्धतीने रचना बदलण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

नाशिक (nashik), मुंबईसह (mumbai) सुमारे 18 महापालिका मध्ये निवडणूक होणे बाकी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असताना महाविकास आघाडी सरकारने निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. त्या काळात नाशिक महापालिकेत 122 वरून 133 नगरसेवक संख्या करण्यात आली होती. तर सुमारे 30 तर 33 हजार लोकसंख्या असलेला एक प्रभाग तीन सदस्य याप्रमाणे रचना करण्यात आली होती. ओबीसी आरक्षण देखील लागू करण्यात आले होता.

त्यामुळे महापालिकेने प्रभाग रचना करून मतदार यादी (voter list) प्रसिद्ध केली होती. त्यावर सुमारे 3800 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यांचाही निपटारा करण्यात येऊन अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे जातीचे आरक्षणासह महिला आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मतदान प्रक्रिया असेच मतमोजणी प्रक्रियेसाठी महापालिकेला एकूण 10 उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लागणार होते, त्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती तर सुमारे दहा हजार सेवक लागणार होते. त्याची तयारी देखील महापालिकेनी पूर्ण केली होती.

अशा पद्धतीने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. दरम्यान आताही चार सदस्य प्रभाग रचना झाली तर 2017 प्रमाणे प्रभाग राहण्याची शक्यता आहे तर असे झाले तर फक्त मतदान यादी बदलून त्यात वाढ होईल व महिला आरक्षणासह जात निहाय आरक्षण नव्याने करण्यात येईल, त्यामुळे महापालिका प्रशासनाला देखील जास्त वेळ लागणार नाही.

अशी रणनीती असू शकते

कसबा निकालानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना पक्ष यांच्यात जोश निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका आणखी पुढे ढकलण्याची तयारी सत्ताधाऱ्यांची असल्याचे वरचेवर बोलले जात असले तरी आत मध्ये भारतीय जनता पक्षासह शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केल्याचे समजते आहे. तर दुसरीकडे विरोधकांना गाफील ठेवून अचानक महापालिका निवडणूक लावण्याची रणनीती देखील सत्ताधाऱ्यांनी केल्याचे समजते आहे. त्यामुळे चालू महिन्याच्या शेवटी नोटिफिकेशन काढून मे महिन्यात निवडणुका घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्याचे समजते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या