Thursday, July 23, 2026
HomeनगरNagarparisha-Nagarpalika Elections : कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डीमध्ये मतदानाला सुरवात; आतापर्यंत किती झाले...

Nagarparisha-Nagarpalika Elections : कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डीमध्ये मतदानाला सुरवात; आतापर्यंत किती झाले मतदान?

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार अर्धवट राहिलेल्या नगर जिल्ह्यातील तीन पालिका व एका नगरपंचायतीसाठी, तसेच सात पालिकांमधील नगरसेवकांच्या १२ जागांसाठी आज शनिवार (दि.२०) रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. यात कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिकेसह नेवासा नगर पंचायतचा समावेश आहे. दरम्यान, उद्या रविवारी लगेच आधीच्या आठ पालिका आणि आताच्या चार अशा १२ पालिकांची एकत्रित मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या पालिका निवडणूका या रंगतदार होण्याची शक्यता असतांना न्यायालय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या गोंधळलेल्या स्थितीमुळे दोन टप्प्यात विस्कळीत स्वरूपात होतांना दिसत आहेत. नगर जिल्ह्यातील ११ नगरपालिका व १ नगरपंचायतसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर ऐन प्रचाराचा टप्पा रंगात आलेला असताना राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमामुळे चार पालिकांच्या निवडणूका लांबल्या होत्या. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २ डिसेंबरला आठ पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, जामखेड, राहाता, शेवगाव, श्रीगोंदा आणि शिर्डी या पालिकांसाठी मतदान झाल्यानंतर यात सात पालिकांच्या एका प्रभागातील नगरसेवकांच्या १२ पदासाठी आणि तीन पालिका व एका नगरपंचायतसाठी आज मतदान होत आहे.

आज मतदान होणाऱ्या पालिकांमध्ये आधीच्या पालिकांप्रमाणे प्रत्येक मतदाराला नगराध्यक्षपदासह दोन नगरसेवकांना असे तीन ठिकाणी मतदान करता येणार आहे. मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी पालिका निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तयारी पूर्ण केली असून आजच्या मतदानानंतर खऱ्याअर्थाने उद्या होणार मतमोजणीची प्रक्रिया महत्वाची राहणार आहे. विनाअडथळा मतमोजणी होवून त्यानंतर लगेच मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

सकाळी साडेसहा वाजता मॉक पोल

सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया होईल. ही प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आज सकाळी ६:३० वाजता सर्व मतदान केंद्रांवर मॉक पोल (चाचणी मतदान) प्रक्रिया सुरू झाली.

संगमनेर, श्रीरामपूरसह या जागांसाठीही मतदान

चार नगरपालिकांचे चार नगराध्यक्ष व सर्व जागा तर सात नगरपालिकांमधील काही प्रभागातील नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्यात कोपरगाव ३०, पाथर्डी २०, देवळाली प्रवरा २१, नेवासे १७ अशा ८८ जागेचा समावेश आहे. संगमनेर प्रभाग १ ब, २ ब, १५ ब, व शेवगाव प्रभाग १ ब, ५ ब, १२ अ, अशा प्रत्येकी ३, जामखेड प्रभाग २ ब, व ४ ब या २ तर श्रीरामपूर प्रभाग ३ अ, राहुरी प्रभाग २ अ, श्रीगोंदे प्रभाग ७ ब, शिर्डी प्रभाग ६ अ प्रत्येकी एक जागा अशा १२ नगरसेवकपदासाठी निवडणूक होत आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...