Monday, June 24, 2024
Homeक्राईमधक्का लागल्याने मनपा सेवकाची हत्या; संशयित टोळक्याचा शोध सुरु

धक्का लागल्याने मनपा सेवकाची हत्या; संशयित टोळक्याचा शोध सुरु

नाशिक । प्रतिनिधी
दुचाकीस धक्का लागल्याच्या कारणातून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दुसऱ्या टोळक्यावर सशस्र हल्ला चढवित एकाची निर्घृण हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता गोदाघाटावरील बालाजी कोट परिसरात घडली. घटनेत सनी जन मायकल(वय ३५, रा. बोधलेनगर, उपनगर) या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा वर्मी घाव लागल्याने तडफडून मृत्यू झाला. तो सातपूर अतिक्रमण विभागात कार्यरत होता, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

सनी आणि त्याचे इतर मित्र बालाजी कोट येथे मद्यपान करत होते. त्यानंतर कुणालातरी सिगारेटची तलब लागल्याने सनी व त्याचा मित्र दुचाकीवरुन सिगारेट आणण्यासाठी निघाले. तेव्हा रस्त्यातच अनोळखी दोघा दुचाकीस्वारांचा आणि सनीच्या दुचाकीला कट लागल्याच्या कारणातून वाद झाला. त्यावेळी सनीने वाद शमवून माघार घेतली. हा वाद संपल्यावर काही मिनिटांत दोघे पानटपरीवर पोहोचले. तेव्हा दुचाकीस्वार संशयित तेथे आले. तेथेही सनी आणि त्याच्या मित्राचे दुचाकीस्वार संशयितांशी वाद झाले. हा वाद मिटवून सनी व त्याचा मित्र बालाजी कोट येथे मद्यपान करण्यासाठी बसले होते.

त्याचवेळी दुचाकीस्वार संशयितांनी पाळत ठेवत ओळखीतील इतर संशयितांना फोन करुन बालाजी कोट येथे बोलावून घेतले. त्यावेळी दुचाकीस्वार संशयितांसह १० ते १२ जणांचे टोळके आले. त्यांनी सनी आणि इतरांवर अचानक सशस्र हल्ला चढवून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात टोळक्याने सनीवर सपासप वार करण्यासह डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर दोन्ही गटांतील टोळके पसार झाले. या घटनेत गोदाघाटासह रामकुंड व इतर भागांत दहशत माजविणाऱ्या गणेशवाडी, पेठरोड, रामकुंड येथील संशयितांचा समावेश असल्याचे कळते. माहिती कळताच सरकारवाडा पाेलीस घटनास्थळी दाखल झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या