Monday, May 20, 2024
Homeनाशिकपर्यावरण संवर्धनासाठी मनपाचे उपक्रम

पर्यावरण संवर्धनासाठी मनपाचे उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराने पर्यावरण संवर्धन व वातावरण बदलावरील कृती संदर्भात हाती घेतलेले विविध उपक्रमांत प्रामुख्याने वृक्षारोपण, कार्यक्षम कचरा व्यवस्थापन व नमामी गोदा संदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करण्यासारख्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून विशेष काम केले जात असल्याचे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी विषद केले.

- Advertisement -

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्लूआरआय इंडिया) या संस्थेतर्फे 17 आणि 18 जुलै रोजी ‘कनेक्ट करो 2023’ ही राष्ट्रीय परिषद दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. या परिषदेमध्ये 17 जुलै रोजी ‘मेनस्ट्रीमिंग अ‍ॅक्शन ऑन क्लायमेट चेंज इन इंडिया सिटीज: पीअर सिटीज नॉलेज एक्स्चेंज’ या विषयावरील सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये वातावरणीय बदलाचे धोके, त्या संदर्भातील शहरांसमोरील आव्हाने, त्याचा सामना करण्यासाठी विविध शहरांनी अवलंबलेल्या उपाययोजना या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात नाशिक महानगरपलिकेच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यापरिषदेत नाशिक महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्यासह कोची शहराचे महापौर अनिल कुमार, मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपमुख्य अभियंता विकास सामंत, बंगळुरू महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य अभियंता बसवराज काबडे आदी मान्यवर पॅनेलवर होते.कनेक्ट करो-2023 या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदचे यंदाचे दहावे वर्षे आहे. भारतासाठी शाश्वत उपायांवर चर्चा करण्यासाठी सुमारे 250 तज्ज्ञ, धोरणकर्ते, उद्योगपती, राजकीय नेते आणि संशोधकांनी परीषदेत यावर्षी सहभाग घेतला होता.

या परिषदेत बोलताना भाग्यश्री बानायत यांनी नाशिक शहरा संदर्भात विविध मुद्यांवर आपले विचार मांडले. नाशिक शहराला वातावरणीय बदल, गोदावरी नदीला येणार पूर, वाढत्या उष्णतेचा धोका तसेच नाशिक शहर पर्यावरणपूर्वक उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना सांगितले. नाशिक शहराचा सध्या सुरू असलेल्या वातावरणबदल कृती आराखड्यातून येणार्‍या शिफारशींवर लक्ष केंद्रित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया ही संस्था सध्या नाशिक महानगरपालिकेसोबत नाशिक शहराचा वातावरण बदल कृती आराखडा तयार करत आहेत. या आराखड्यावर आधारित, शहरातील काही कृती आणि उपक्रम महानगरपालिकेतर्फे प्राधान्याने विचारात घेतले जातील, याचे त्यांनी आश्वासन दिले. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया ही एक आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था आहे जी सध्या महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तत्त्वांनुसार नाशिक शहरासाठी वातावरण बदल कृती आराखडा तयार करत असल्याचे त्यांनी शवटी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या