Monday, April 28, 2025
Homeनाशिकजेहान सर्कल ते मखमलाबाद पूलाचे काम 'या' महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा मनपाचा निर्धार

जेहान सर्कल ते मखमलाबाद पूलाचे काम ‘या’ महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा मनपाचा निर्धार

नाशिक | प्रतिनिधी

गंगापूर रोड ते मखमलाबाद दरम्यानच्या नव्या पूलामुळे वाहतुक सुलभ होणार असून रखडलेल्या कामाला नुकतीच सुरुवात झाल्याने येत्या जुन महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा निर्धार मनपा प्रशासनाने केला आहे.

- Advertisement -

नाशिक शहराच्या विकासासाठी नवनवीन प्रकल्प राबविण्यात येत असून त्या माध्यमातून शहराच्या दळणवळणाला सुरळीतपणा आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच माध्यमातून जेहान सर्कल ते मखमलाबाद पूलाच्या कामामुळे वाहनधारकांना शहरातील वाहतुकीच्या जाचातून जाण्यापेक्षा थेट आरटीओ जवळ पेठ रोडला व पुढे दिंडोरी रोडवर जाण्यासाठी सुलभ मार्ग तयार होणार आहे.

दरम्यान, या पूलाच्या कामाला प्रत्यक्षात २०१८-१९ मध्ये सूरुवात झालेली होती. त्यावेळी १८ कोटी रुपयांचा खर्च आपेक्षित होता. या पूलासाठी उभे करावे लागणारे पिलर खोल दगड लागेपर्ययत खाली न्यावे लागतात. त्या कामासाठी खर्च वाढल्याने ठेकेदाराने कामाला असमर्थता दर्शवली होती. या पूलाच्या निर्माणात स्थानिक नागरीकांची जमीन जात असल्याने त्यांनी या कामास विरोध केला होता. परिणामी काम थांबवले गेले होते. सोबतच १८ टक्के जीएसटी लागू झाल्याने जुन्या दरात काम परवडणारे नसल्याने ठेकेदार सिताराम डेव्हलपर्स यांनी काम बंद केले होते.

मनपाने जागा मालकाशी संवाद साधून त्यांना टीडीआर व इतर मोबदले देऊन जागेचा प्रश्न निकाली काढला. तसेच जीएसटी व वाढीव खर्चापोटी ठेकेदाराला ५ कोटी रक्कम वाढीव देण्याचे निश्चित केल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

या पूलाची उंची जास्त असल्याने व पावसाळ्यात पूराच्या पाण्यात इतर पूल बंद होत असल्याने हा पूल उपयुक्त ठरणार असल्याचे मनपाचे म्हणणे आहे. सिंहस्थ काळात इतर मार्ग बंद होत असताना या मार्गावरुन वाहन चालकांना शहरा बाहेर पडणे सोपे होणार असल्याने भविष्यात हा पूल वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे म्हणणे आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...