Friday, February 6, 2026
Homeक्राईमसोन्यासाठी नातवाने दाबला आजीचा गळा

सोन्यासाठी नातवाने दाबला आजीचा गळा

अकोळनेर शिवारातील घटना || खुनी नातू गजाआड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आजीच्या अंगावरील सोने काढून घेण्यासाठी नातवाने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर शिवारात घडली. गोदाबाई लक्ष्मण जाधव (वय 90 रा. अकोळनेर) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. त्यांचा मुलगा पोपट लक्ष्मण जाधव (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश बाळासाहेब जाधव (रा. अकोळनेर) असे खून करणार्‍या संशयित आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

दरम्यान, घटना घडल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी नीलेश जाधव याला ताब्यात घेत अटक केली. त्याला सोमवारी (21 ऑक्टोबर) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. फिर्यादी पोपट जाधव यांच्याकडे त्यांच्या आई गोदाबाई राहत होत्या. शनिवारी (19 ऑक्टोबर) सकाळी सव्वा आठच्या सुमारास नीलेश तेथे आला व त्याने गोदाबाई यांना सोबत नेले. त्यांच्या कानातील सोन्याची फुले, गळ्यातील माळ असा ऐवज काढून घेत असताना गोदाबाईने विरोध केला. त्यावेळी नीलेशने त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर कानातील सोन्याची फुले, गळ्यातील माळ असा 70 हजाराचा ऐवज काढून घेतला.

YouTube video player

दरम्यान, गोदाबाईचा खून झाल्याचे दुसर्‍या दिवशी रविवारी (20 ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आले. नगर तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खुनी निलेशला ताब्यात घेत अटक केली आहे. दरम्यान, दारूचे व्यसन, लोकांकडून घेतलेले उसणे पैसे देण्यासाठी नीलेशने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिते करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...